। रत्नागिरी । प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावर भरणे येथील नव्या जगबुडी पुलावरील उखडलेल्या भागाच्या दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू आहे. 17 दिवसांचा कालावधी उलटूनही दुरूस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे एकाच मार्गिकेवरून दोन्ही दिशांना धावणारी वाहतूक सुरू ठेवावी लागत असून वाहनांचा वेगही मंदावला आहे. याबाबत वाहनचालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच, जगबुडी पुलाचा मध्यभाग उखडल्यामुळे काही दिवसांपूर्वी अचानक भेगा गेल्या होत्या. ऐनः मुसळधार पावसात हा प्रकार उघड झाला आहे. गणेशोत्सवापूर्वी या मार्गावरील वाहतूक वाढणार आहे. यापूर्वी ही मार्गिका खुली केली तर उपयोग होईल अन्यथा वाहतूककोंडीला सामोरे जावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.
जगबुडी पुलाचे काम संथगतीने
