जगदीप धनकड देशाचे नवे उपराष्ट्रपती

| दिल्ली | वृत्तसंस्था |

देशाला आज नवे उपराष्ट्रपती मिळाले आहेत. एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला.

धनकड यांना 528, तर अल्वा यांना 182 मते मिळाली. जगदीप धनकड हे विद्यमान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे आणि नवीन उपराष्ट्रपती 11 ऑगस्ट रोजी शपथ घेतील. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 780 पैकी 725 खासदारांनी मतदान केले. संसदेच्या दोन्ही सभागृहांची मिळून एकूण सदस्यसंख्या 788 आहे.

Exit mobile version