अटीतटीच्या लढतीत पांडबादेवी रायवाडी संघावर मात
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
ओमकार क्रीडा मंडळ व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने वेश्वी येथे रविवार, दि. 4 मार्च रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाली. या कबड्डी स्पर्धेत जय बजरंग बेली संघाने पांडबादेवी रायवाडी संघाला अटीतटीच्या सामन्यात एका गुणाने पराभूत करीत प्रथम क्रमांक पटकाविला. जय हनुमान चरी आणि नागेश्वर आवास संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.
जिल्ह्यातील एकूण 34 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेत रायवाडी संघाच्या केदार लाल याला उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकडीसाठी चरी संघाच्या राहुल भोईर, आदर्श खेळाडू म्हणून उरण संघाच्या पंकज म्हात्रे, पब्लिक हिरो आवास संघाच्या गिरीश भगत, तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून बेली संघाच्या सुयोग साळावकर याला घोषित करण्यात आले. विजेत्या संघांना ओमकार क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, गिरीश शेळके, राकेश राऊळ, अमोल नलावडे, अमित मुळूस्कर, प्रशांत राऊळ यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी रायगड जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत विजेत्या जय बजरंग बेली संघाचा, याचबरोबर जिल्हा निवड चाचणी किशोर गटातील मुले आणि मुली या दुहेरी स्पर्धेत विजेत्या ओमकार वेश्वी संघाचा आणि जिल्हा कबड्डी संघात निवड झालेल्या खेळाडूंचा विशेष सत्कार ओमकार क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आला. सदर स्पर्धेचे उद्घाटन पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह आणि शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते झाले. ओमकार क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या या स्पर्धेला आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील, महारष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह अॅड. आस्वाद पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक मंदार वर्तक, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, सवाई पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्या चित्रा पाटील, पंचायत समिती माजी सभापती प्रमोद ठाकूर, उपसभापती मीनल माळी, वेश्वीच्या उपसरपंच आरती पाटील, अनंत मुळूस्कर, राजेंद्र राऊळ, नरेश पडियार, चेंढरेचे माजी सरपंच दत्ता ढवळे, अरुण पाटील, अॅड. प्रसाद पाटील, अॅड. किशोर हजारे, जेएसएमचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील, कबड्डी निरीक्षक जनार्दन पाटील आदी मान्यवरांनी भेट दिली.
यावेळी मंडळाचे सदस्य अमोल नलावडे, संजय उले, निलेश नलावडे, प्रसाद मगर, किरण गुरव, किशोर कदम, सुशांत नलावडे, वीरू मगर, अंकित शेळके, निकेश शेळके, दिगम्बर गोळे, राजेंद्र गाणार, निलेश मगर, हेमंत नाईक, सुरेश शेळके, मनीष पाटील, पंकज गुरव, सुयोग घरत, रोहित मिंडे, नंदकुमार मिसाळ, संदीप घरत, स्वप्नील शेळके, अमोल गुरव, ओमकार नलावडे, रुपेश गुरव, मंगेश पाटील, सौरभ शेळके, प्रतीक गुरव, जितेंद्र गुरव, ऋषी गोळे, गौरव राऊळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.