| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
स्वराज्य युवा संघटना भार्जे यांच्यावतीने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत संघानी आपला प्रवेश नोंदविला होता. या कबड्डी स्पर्धेसाठी क्रीडाप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या स्पर्धेचे नियोजन या मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. अंतिम लढत जय बजरंग रोहा विरुद्ध आकादेवी बोरी या संघात झाली. अंतिम विजेता जय बजरंग रोहा या संघास रोख रक्कम 25 हजार व आकर्षक चषक तर द्वितीय क्रमांक आकादेवी बोरी या संघास 15 हजार व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक गावदेवी मुंढाणी, तर चतुर्थ क्रमांक टीबीएम करावी या संघांना प्रत्येकी 10 हजार व आकर्षक चषक देऊन मंडळच्या वतीने गौरविण्यात आले.






