क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी

| कोलाड | प्रतिनिधी |

गोवे-कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने पर्व 8 च्या श्री सोमजाई प्रसन्न गोवे यांच्या वतीने क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले. या क्रिकेटच्या अंतिम सामना जय हनुमान आंबेवाडी संघ अंतिम विजेता संघ ठरला.

या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन ज्येष्ठ कार्यकर्ते तानाजी जाधव, गोवे ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव, नरेंद्र पवार, गोवे गाव कमेटी अध्यक्ष बळीराम जाधव, युवा कार्यकर्ते राकेश कापसे, लहू पिंपळकर, लिलाधर दहिंबेकर, कमलाकर शिर्के, भरत जाधव, पांडुरंग जाधव, महेंद्र जाधव, नितीन जवके, पोलीस पाटील सुरेश जाधव, रामचंद्र कापसे, सचिन शिंदे, नंदा वाफिळकर, निलेश वाफिळकर, शांताराम घरट तसेच गोवे-कोलाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र जाधव सर्व सदस्य तसेच श्री.सोमजाई प्रसन्न गोवे यांचे पदाधिकारी व सर्व सदस्य यांच्या उपस्थित करण्यात आले. या क्रिकेटच्या शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलेल्या रोमहर्षक अटीतटीच्या अंतिम सामन्यात जय हनुमान आंबेवाडी संघाने श्री.सोमजाई तिसे संघावर विजय मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. श्री.सोमजाई तिसे संघ द्वितीय, तर सोनारसिद्ध धाटाव संघ तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. मालिकावीर जय हनुमान आंबेवाडी संघाचा आशिष पांचाळ, उत्कृष्ट फलंदाज श्री सोमजाई तिसे संघाचा प्रज्योत जाधव, उत्कृष्ट गोलंदाज सोनार सिद्ध धाटाव संघाचा मंदार साबळे यांना देण्यात आले. सर्व विजेत्या संघाना आकर्षित चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.सर्व क्रिकेट सामने यशस्वी करण्यासाठी श्री. सोमजाई प्रसन्न संघाचे पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version