कबड्डी स्पर्धेत जय सोंडाई प्रसन्न संघ विजयी

। खोपोली । प्रतिनिधी ।
जय सोंडाई माता खैराट यांच्या वतीने रायगड जिल्हा धनगर समाज कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला जय सोंडाई प्रसन्न पाली कर्जत, तर द्वितीय क्रमांक टिटविचा राजा, तिसरा क्रमांक जय वाघोबा वाघेश्‍वर आणि चौथा क्रमांक कालभैरव कबड्डी संघ गोगुलवाडा यांनी पटकविला

या स्पर्धेत एकूण 23 संघांनी सहभाग घेतला होता. धनगर समाजातिल मुलांची शैक्षणिक प्रगती बरोबरच क्रीडा क्षेत्रातही महत्त्वाची भूमिका असावी या उद्देशाने रायगड जिल्ह्यातून धनगर समाजातील उत्कृष्ट खेळाडू तयार व्हावे यासाठी रायगड जिल्हा धनगर समाज कबड्डी असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असे कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण ढेबे यांनी सांगितले.

Exit mobile version