| मुंबई | वृत्तसंस्था |
इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत दोन द्विशतकं ठोकणार्या यशस्वी जयस्वालला आयसीसी क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. आयसीसी क्रमवारीमध्ये यशस्वीने गगणभरारी घेतली आहे. आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी जारी केली आहे. अवघ्या आठ कसोटी सामन्यानंतर यशस्वीने टॉप 15 फलंदाजामध्ये स्थान पटकावले आहे. यशस्वी विराटच्याजवळ पोहचला आहे. तो विराटपासून फक्त दोन पावले दूर आहे.
आयसीसी कसोटी क्रमवारीत यशस्वी 12 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विराट आयसीसी क्रमवारीत नवव्या क्रमांकावर आहे. इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेचा विराट कोहली भाग नाही. यशस्वी याच्या नावावर 727 रेटिंग गुण आहेत, तर विराट कोहली 744 रेटिंग गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे.
टॉप-5 मध्ये एकही भारतीय नाही - कसोटी क्रमवारीत टॉप 5 फलंदाजांच्या यादीत एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा केन विल्यमसन अव्वल स्थानावर विराजमान आहे. विल्यमसनच्या नावावर 893 रेटिंग गुण आहेत. तर 818 रेटिंग गुणांसह ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ दुसर्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा जो रुट 799 रेटिंग गुणांसह तिसर्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा डेरिल मिचेल 780 रेटिंग गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा बाबर आझम 768 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.