जेक फ्रेसरला ऑस्ट्रेलिया संघात स्थान

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात दिल्ली कॅपिटल्स संघासाठी मोलाची कामगिरी करणारा युवा फलंदाज जेक फ्रेसर मॅकगर्क याला ऑस्ट्रेलियाच्या टी-20 विश्‍वकरंडकासाठीच्या संघात स्थान मिळाले आहे. मॅकगर्क याला पर्यायी खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. वेस्ट इंडीज व अमेरिका येथे एक जूनपासून टी-20 विश्‍वकरंडकाला सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट निवड समितीचे प्रमुख जॉर्ज बेली यांनी टी-20 संघाची निवड केली तेव्हा पर्यायी खेळाडू म्हणून एकालाच विश्‍वकरंडकाला पाठवण्यात यावे, असे सुचवले होते, पण मॅकगर्क याची आयपीएलमधील फलंदाजी बघितल्यानंतर मॅथ्यू शॉर्ट याच्यासह मॅकगर्क याचीही निवड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Exit mobile version