सहाण येथे ‘जलाराम जयंती’ उत्साहात

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील सहाण येथे गुरुवारी (दि. 11) जलाराम मंदिरात जलाराम जयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन मेहता परिवारातर्फे करण्यात आले होते. जलाराम जयंती संपूर्ण भारतात आणि परदेशात आणि विशेषतः जलाराम मंदिरांमध्ये साजरी केली जाते.
जलाराम हे बापा म्हणून प्रसिद्ध आहेत. ज्यांची मुख्यतः गुजरातमध्ये पूजा केली जाते. ते हिंदू संत आणि रामाचे भक्त होते. त्यांचे म्हणणे आणि चमत्कार भारत आणि इतर देशांमध्ये पसरलेले आहेत. म्हणून, त्यांना एक विशेष दिवस समर्पित करण्यात आला आहे. जलाराम जयंती हिंदू चंद्र-कॅलेंडरच्या कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरा केला जातो. साधू, संत आणि गरजू भुकेल्या लोकांना अन्न पुरवण्यासाठी त्यांनी सदाव्रत हे आहार केंद्र सुरू केले होते. त्यांच्याकडे आलेले कोणीही उपाशी जात नसत. त्यामुळे त्यांच्या जयंतीला मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
सहाण येथील जलाराम मंदिर स्व. नरेंद्र मेहता यांच्या इच्छेनुसार त्यांचे सुपूत्र योगेश मेहता आणि जितेंद्र मेहता यांनी सहाण येथे 2013 रोजी उभारले व तेव्हापासून दरवर्षी ‘जलाराम जयंती’चा उत्सव साजरा करण्यात येतो.

Exit mobile version