| अलिबाग | प्रतिनिधी |
पर्यावरणाचा समतोल राखणे, जमिनीची धूप रोखणे, शुद्ध हवा मिळण्यासाठी वृक्षलागवड गरजेचे असल्याने सामाजिक बांधीलकी जपत अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. अलिबाग तालुक्यातील सहाण बायपास मार्गावरील जलाराम मंदिराच्या परिसरात नारळ, सुपारीच्या रोपांची लागवड रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष समीर मालोदे, खजिनदार जितेंद्र मेहता, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष तुषार थळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष सुदेश माळी, सुबोध घरत, सचिव विकास पाटील, सहसचिव अमोल नाईक, खजिनदार विवेक पाटील, सहखजिनदार प्रणेश म्हात्रे, सल्लागार सुरेश खडपे, सदस्य अभिजित काटकर, अतुल वर्तक, अमर मढवी, विजय पाटील, गणेश जाधव, जयेंद्र वाघमारे, पंकज म्हात्रे, निलेश दुदम, योगेश सावंत, सुधाकर खंडाळकर उपस्थित होते.