श्रीवर्धन येथील लक्ष्मी विजय नौकेला जलसमाधी

। श्रीवर्धन  । भारत  चोगले ।
श्रीवर्धन जीवना बंदर येथील श्रीकृष्ण सहकारी मत्यव्यावसायिक संस्थेतील लक्ष्मी विजय नौका IND MH 3 MM 4193 ला जलसमाधी मिळाली. त्यामुळे लाखो रुपयांचे  नुकसान  झाले असुन त्यामधील चार खलाशी  हे मुत्यूशी झुंज  देत  बालबाल बचावले. गेल्या  वर्षीप्रमाणे याहीवर्षी  समुद्रामध्ये  होत असलेल्या  छोट्या  मोठ्या  वादळामुळे  मच्छीमारी  ही धोक्यात आली आहे. रविवारी दुपार नंतर समुद्रात अचानकपणे  वादळवारे वाहायला सुरुवात झाली. त्यामध्येच अनिकेत लक्ष्मण रघुविर लक्ष्मी विजय नौका भरकटली व दगडावर आदळून नौकेला जलसमाधी मिळाली . त्या नौकेमधील बाळकृष्ण  रघुविर,  जयेश रघुविर,  गणेश कुलाबकर यांनी समुद्राच्या पाण्याशी झुंज  देत  स्वतःचा बचाव केला. मात्र या सगळ्यात झालेल्या १२ ते १५ लाख रुपयांची नुकसायामुळे सरकारने सहकार्य  करावे अशी मागणी  श्रीवर्धन  तालुक्यातील मच्छीमारांकडून  केली जात  आहे.  

Exit mobile version