जयगड सागरी पोलिसांचे जांभारीत संचलन

| रत्नागिरी | वार्ताहर |

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जयगड पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांमध्ये कायद्याचा धाक राहावा. यासाठी जांभारी व इतर हद्दीमध्ये संचलन केले.

विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्येक पोलिसांनी अंतर्गत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा आपापल्या विभागामध्ये सज्ज झाले आहे. जयगड सागरी पोलिस ठाणेअंतर्गत जांभारी गावात संचलन करण्यात आले. भैरी मंदिर, जमातवाडी, कटनाक वठार, वासावे वठार, पावरी वठार, झरवे वठार व तरी बंदर या मार्गे संचलन करण्यात आले. सीआयएसएफ पोलिस इन्स्पेक्टर सुनील जाधव व सागरी पोलिस ठाणे जयगडचे एपीआय कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन झाले तसेच या वेळी जांभारीचे पोलिस पाटील उमेश चौगुले यांच्यासग पोलीस पाटील, अन्य अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version