। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
खेड तालुक्यातील निगडे येथील वेदांत हॉटेलमध्ये शुक्रवारी (दि.27) मारहाणीची घटना घडली होती. गोवा येथून आलेल्या पर्यटकांनी भाकरी देण्यास उशीर झाल्यामुळे हॉटेल मॅनेजर जितेंद्र रसाळ यांच्यावर हल्ला चढवला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातून काही पर्यटक निगडीतील वेदांत हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. त्यांनी अतिरिक्त भाकरीची ऑर्डर दिली होती. मात्र, भाकरी शेकण्यात उशीर झाल्यामुळे पर्यटकांना राग आला. त्यांनी हॉटेल मॅनेजर रसाळ यांच्याशी वाद घालून त्यांना मारहाण केली. यामध्ये रसाळ यांना मुक्कामार बसला आहे, तर हॉटेलमधील फर्निचरही तुटले आहे. या प्रकरणी रसाळ यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांच्या शोध सुरु आहे. या घटनेमुळे खेड परिसरात खळबळ उडाली आहे. पर्यटकांनी अशा प्रकारे वागणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.