जानकी सुटे यांचे निधन

। रोहा । वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील देवकान्हे गावच्या रहिवासी तथा आयुष्याची शतकी गाठणार्‍या जानकी सखाराम सुटे यांचे गुरूवार (दि.28) वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. जानकी सुटे या अतिशय प्रेमळ शांत स्वभावाच्या होत्या. शेती क्षेत्रावर त्यांचे विशेष लक्ष होते. तर कौटुंबिक व सार्वजनिक कार्यक्रमात त्या नेहमीच अग्रेसर असायच्या. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा, मुली, सुना, जावई, नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी शनिवार (दि.6) उद्धर (पाली) येथे तर अंतिमविधी सोमवारी (दि.8) देवकान्हे येथील राहत्या घरी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version