क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
| नागोठणे | वार्ताहर |
नागोठणे विभागातील पिगोंडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिवंगत जनार्दन कोळी यांच्या स्मृतिंना उजाळा मिळण्यासाठी श्री जाखमाता एम. आय. जी वेलशेत व संतोष कोळी मित्रमंडळ यांच्या संयुक्तविद्यमाने वेलशेत येथील भव्य मैदानावर 19 ते 21 जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या स्व. जनार्दन कोळी स्मृतिचषक टेनिस क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन शुक्रवारी(दि.19) सकाळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रकांत कोळी, नंदू कोळी, संतोष कोळी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
या स्पर्धेच्या उद्घाटनाला भाई टके, शिवराम शिंदे, सदानंद गायकर, विलास चौलकर, सुधाकर पारंगे, यादव माळी, संतोष कोळी, उदय जवके, किशोर म्हात्रे, बाळासाहेब टके, सिराज पानसरे, अनिल डाकी, विनय गोळे, सचिन कळसकर, गंगाराम मिनमिणे, चंद्रकांत भालेकर, नितीन राजिवले, अंकुश ताडकर, शैलेश शेलार, विजय अहिरे, मारुती पारंगे, रवी वाजे, संतोष शहासने, विजय पारंगे, कांचनत माळी, रंजना माळी, कुसूम बावकर, विनोद पाटील, एस.एम. भालेराव, संतोष ताडकर यांच्यासह क्रिकेटप्रेमी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुंडलिक ताडकर यांनी केले.