जनार्दन ठाकूर यांना बढती

| पाली | वार्ताहर |

नागोठणे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जनार्दन गोविंद ठाकूर यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली आहे. ते नागोठणे पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत राहणार आहेत. ठाकूर यांना खात्यांतर्गत सेवा जेष्ठतेनुसार पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळालीआहे.

1986 सालापसून पोलीस सेवेत कार्यरत असलेले जनार्दन ठाकूर यांनी आपल्या अखंड सेवेत प्रामाणिकपणा, शिस्तप्रिय याबरोबरच कर्त्यव्यनिष्ठ पोलीस कर्मचारी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. मुळचे अलिबाग तालुक्यातील चरी कोपर येथील रहिवासी असलेले ठाकूर यांनी कर्जत, रेवदंडा, अलिबाग, पेणसह कोलाड टॅप, महाड टॅप आदि पोलीस ठाण्यात आपले कर्तव्य बजावले आहे.

Exit mobile version