आयर्लंड दौऱ्यात जसप्रीत, श्रेयसचा समावेश

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारताचा वेस्ट इंडीज दौरा झाल्यानंतर पुढच्या महिन्यात आयर्लंड दौऱ्यावर देखील जाणार आहे. या दौऱ्यावर भारताचा युवा संघ पाठवण्यात येणार आहे. या दौऱ्यात भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळण्याची शक्यता आहे. तो आता पूर्णपणे फिट होण्याच्या दिशेने पुढे सरकत आहे. सध्या तो बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकॅडमीत ट्रेनिंग करत आहे. तो आपला गोलंदाजीचा कोटा हळू हळू वाढवत आहे. जसप्रीत बुमराह बरोबरच श्रेयस अय्यर आणि प्रसिद्ध कृष्णा देखील आशिया कपपर्यंत फिट होण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमराहच्या पाठीवर मार्च 2023 मध्ये शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर तो भारतीय संघातून बाहेरच होता. तो एनसीएमध्ये पुनर्वसन केंद्रात सराव करत होता. गेल्या महिन्यात त्याने गोलंदाजी करण्यास सुरूवात केली होती.

लक्ष्मण यांच्या देखरेखीखाली को नेट्समध्ये पूर्ण ताकदीने गोलंदाजी करत असून तो 8 ते 10 षटके टाकत आहे. निवडसमितीला आशा आहे की तो सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशिया कपपूर्वी फिट होईल. बुमराहला नेट्समध्ये गोलंदाजी करताना कोणतीही अडचण येत नाही. त्यामुळे तो एनसीएमध्ये काही सराव सामने देखील खेळू शकतो. गेल्या काही आठवड्यातील त्याची प्रगती पाहता तो पुढच्या महिन्यात भारतीय संघासोबत आयर्लंड दौरा देखील करू शकतो. येत्या काही दिवसात त्याच्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. बुमराह सप्टेंबर 2022 पासून सामना खेळलेला नाही. युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा देखील आपल्या स्ट्रेस फ्रॅक्चर सर्जरीनंतर दुखापतीतून सावरत आहे. त्याने देखील पुन्हा गोलंदाजी करणे सुरू केले आहे. तो देखील दुखापतीमुळे आयपीएल 2023 चा हंगाम खेळला नव्हता. मात्र तो वर्ल्डकप पर्यंत फिट होणार की नाही याबाबत अजून स्पष्टता नाही. मात्र त्याने नेट्समध्ये गोलंदाजी करण्यास सुरूवात केली आहे.

त्यामुळे निवडसमितीसमोर मधल्या फळीत कोणाला संधी द्यायची हा प्रश्न उभारू शकतो. बुमराहप्रमाणे अय्यर देखील आयर्लंड दौऱ्यावर जाऊ शकतो. भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलने भारतीय संघात पुनरागमन केलं असून आता तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघातील एक महत्वाचा सदस्य आहे. मात्र 2021 च्या आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर बेंगलोरने त्याला रिटेन न करण्याचा निर्णय घेतला होता. चहलने चिन्नास्वामी सारख्या फिरकीसाठी मृत्यूचा सापळा ठरणाऱ्या खेळपट्टीवर आरसीबीची 8 वर्षे यशस्वी सेवा केली होती. मात्र तरी देखील आरसीबीने त्याला रिटेन न करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर युझवेंद्र चहलने आता मन मोकळे केले आहे.

श्रेयस अय्यर डोकेदुखी
जसप्रीत बुमराहप्रमाणे श्रेयस अय्यर देखील पाठीच्या दुखापतीतून सावरत असून त्याने देखील आपल्या पाठीवर शस्त्रक्रिया करून घेतली होती. त्याने आता नेट्समध्ये फलंदाजी करण्यास सुरूवात केली असून तो देखील संघ निवडीसाठी लवकरच उपलब्ध होऊ शकतो.

पहिल्या सामन्यापासून विराट कोहलीने माझ्यावर विश्वास दाखवला. मात्र फ्रेंचायजीकडून 8 वर्षे खेळल्यानंतरही रिटेन न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मला वाईट वाटणं स्वाभाविक आहे.फ ममी लोकं युझवेंद्र चहलने जास्त पैसे मागितले असले असं बोलताना ऐकलं होतं. म्हणूनच मी ही गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की मी कोणतीही मागणी केली नव्हती. मला माहिती आहे की माझी योग्यता किती आहे. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे आरसीबीने साधा एक फोन देखील केला नाही. त्यांनी माला कोणतीही गोष्ट सांगितली नाही.

युझवेंद्र चहल,क्रिकेटर
Exit mobile version