जय बजरंग नवेदर बेली अंतिम विजेता
। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि जय शंकेश्वर बामण गाव ह्यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील नामांकित बत्तीस संघाने सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचे उद्घाटन चित्रलेखा पाटील शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडी प्रमुख तसेच अनिल पाटील शेतकरी कामगार पक्ष तालुका चिटणीस, राजेंद्र म्हात्रे सरपंच ग्रामपंचायत तळ काविर याच्या उपस्थित पार पडला.
या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता जय बजरंग नवेदर बेली संघ ठरला तर, द्वितीय क्रमांक नूतन हनुमान ढवर तृतीय क्रमांक स्वराज्य आक्षी चतुर्थ क्रमांक जय हनुमान क्रीडा मंडळ पुतुबईचा पाडा या संघांनी क्रमांक पटकाविला. सर्वोत्कृष्ट खेळाडू बजरंग नवेदर बेली संघाचा सुयोग सालवकर आणि उत्कृष्ट चढाई सुयोग ठाकूर नूतन हनुमान ढवर आणि उत्कृष्ट पकड पुतुबई पाडा संघाचा सिद्धेश भोईर यांना सन्मानित करण्यात आले बक्षीस समारंभाला अनिल पाटील, संदीप वाघपंजे, अविनाश ठाकूर, अनंत थळे व इतर ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे निरीक्षक हेमंत राहुल, जनार्दन पाटील व इतर सर्व पंच यांनी खूप सहकार्य केले. समालोचन संजय पोईलकर यांनी केले. स्पर्धेसाठी जय शंकेश्वर बामणगाव क्रीडा मंडळाच्या पदाधिकार्यांनी व ग्रामस्थांनी खूप परिश्रम घेतले