जयंत पाटील यांच्याकडून गांगल कुटुंबाचे सांत्वन

| चणेरा | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाचे रोहा येथील निष्ठावंत कार्यकर्ते संजय गांगल यांच्या निधनाने शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे पक्षाने एक निष्ठावंत कार्यकर्ता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. या दुःखद प्रसंगी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी रोहा येथील गांगल यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. गांगल हे रोहा परिसरातील शेकापचे प्रमुख जेष्ठ कार्यकर्ते म्हणून परिचित होते. पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून त्यांनी संघटनेच्या कार्यात योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला.

यावेळी शेकापचे कमळाकर वाघमोडे, आरडीसीसी संचालक गणेश मढवी, जिल्हा चिटणीस सदस्य तुकाराम खांडेकर, हरीचंद्र खांडेकर, तालुका चिटणीस शिवराम महाबळे, आरे सरपंच राजेंद्र मळेकर, राजू तेलगे, अजगर सय्यद, तुकाराम शिंदे, विनायक धामणे, प्रविण जांभेकर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी गांगल कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना या कठीण प्रसंगी धीर दिला.

Exit mobile version