| रोहा | प्रतिनिधी |
रोहे शहरातील संजय गांगल यांच्या मातोश्री निवृत्त शिक्षिका विजया विनायक गांगल यांचे 31 ऑक्टोबर रोजी वयाच्या 87 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. पतीच्या निधनानंतर त्यांनी इ. 7 वी मध्ये प्रवेश घेऊन रोहा येथे इ. 11 वी पर्यंत माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. नंतर पुण्यात डी.एड. पर्यंत शिक्षण नंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळा रोहा येथे शिक्षिका म्हणून सेवा दिली. त्यांच्या पश्चात मुलगा संजय, मुलगी साधना, त्यांचे पुतणे ॲड. संजय गांगल, सुन, जावई, नातवंड, पतवंड असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला रोहे शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, सोमवारी (दि.3) शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, सुप्रिया पाटील, ॲड. हेमंत गांगल, संदीप गांगल, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य अनिल पाटील, आरडीसी बॅंकचे संचालक गणेश मढवी, शिवराम महाबळे, विनायक धामणे, राजा मळेकर, मनोहर महाबळे, हरीशचंद्र खांडेकर, प्रताप देशमुख, सुबोध देशमुख व अशोक कोशिंबकर आदी मंडळींनी गांगल कुटुंबियांना सांत्वनपर भेट दिली.






