| रोहा | प्रतिनिधी |
रोहे शहराची साहित्य नगरी म्हणून ओळख असलेल्या भाटे सार्वजनिक वाचनालय येथे दर्जेदार दिवाळी अंक उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अध्यक्ष किशोर तावडे, संचालक नितीन प्रधान, हेमंत ओक, दुर्ग अभ्यासक सुखद राणे, ज्येष्ठ मार्गदर्शक गजानन मळेकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. सरस्वती मातेला वंदन करून व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्राचा सांस्कृतिक परंपरा असलेल्या दर्जेदार दिवाळी अंक- 2025 चे उद्घाटन मोठ्या उत्साही वातावरणामध्ये करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक कलाब, केशव म्हस्के, ब्राह्मण मंडळाचे माजी अध्यक्ष हेमंत ओक, भरत चौधरी, भिडे, स्वप्नील परांजप आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक, सूत्रसंचालन ग्रंथपाल आरती धारप, यांनी केले, तर आभार उपाध्यक्ष वसंत भट यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी ग्रंथपाल आरती धारप आणि कर्मचारी वृंद सायली धाटावकर, वैष्णवी जोशी, चेतन पिसाट यांनी अथक परिश्रम घेतले.






