आदिवासी प्रीमियर लीग स्पर्धेत जे.डी.इलेव्हन संघाची बाजी

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने कर्जत आदिवासी प्रीमियर लीग 2021 चे आयोजन केले होते.व् यावसायिक पद्धतीने खेळविल्या गेलेल्या पाच दिवसीय आदिवासी प्रीमियर लीगचे विजेतेपद जे.डी.इलेव्हन या संघाने पटकावले.
आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जत यांच्या मान्यतेने कर्जत तालुक्यातील आदिवासी क्रिकेट खेळाडूंसाठी व्यावसायिक पातळीवर 20 संघांमध्ये आदिवासी प्रीमियर लीग 2021 चे आयोजन बेकरे येथील मैदानावर आयोजित केले होते. पाच दिवसीय आदिवासी प्रीमियर लीग मध्ये आदिवासी समाजातील 500 हुन अधिक खेळाडू यांनी नाव नोंदणी केली होती. 20 व्यावसायिक संघांमध्ये 400 खेळाडूंना सहभागी करून घेण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांचे हस्ते झाले,. यावेळी आदिवासी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष मालू निरगुडा, आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जतचे अध्यक्ष नरेश शेंडे, कैलास खडके, सोमनाथ वाघमारे, शरद ठोंबरे धनजय पवार, प्रकाश लोभी, हेमंत खंडवी आदी उपस्थित होते.
आदिवासी प्रीमियर लीग स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून प्रकाश पारधी यास तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून दिपक निरगुडा तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून वसंत पवार आणि स्वप्नील यास सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version