| पनवेल | वार्ताहर |
घरकामास राहून घरातील सोन्याचे दागिने चोरी करणार्या महिलेस गुन्हे शाखा कक्ष 2 ने 48 तासात अटक करून तिच्याकडून 3 लाख 30 हजार किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. फिर्यादी यांचे घराचे रिनोवोशन असल्यामुळे ते त्यांच्या बहिणीच्या घरी सत्यम हाईट्स, प्लॉट नंबर 81, सेक्टर 19, कामोठे येथे राहण्यास होते. सदर घरामध्ये फिर्यादी यांनी बेडरूमधील कपाटात त्यांचे आईवडिलांचे सोन्याचे दागिने ठेवलेले होते. सदरचे सोन्याचे दागिने त्यांच्या घरामध्ये काम करणारी संकिता जाधव हिने चोरी केले असल्याच्या संशयावरुन कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपासाचे अनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष 02,पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांचे नेतृत्वाखाली पोलीस पथक नेमून सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असताना संशयीत महिला संकिता संतोष जाधव (रा. सेक्टर 14, कामोठे) हिस ताब्यात घेऊन चौकशी केला असता तिने सदरचा गुन्हा केला असल्याचे कबूल केले. सदर महिलेस अटक करुन तिच्याकडून गुन्हयात चोरीस गेलेले एकुण 03,30,000/-रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली सपोनि संदीप गायकवाड, प्रविण फडतरे, पोउपनि मानसिंग पाटील, वैभव रोंगे, सुदाम पाटील, सफौ. सुदाम पाटील, पोहवा अनिल पाटील, प्रशांत काटकर, मधुकर गडगे, तुकाराम सुर्यवंशी, रणजित पाटील, सचिन पवार, ज्ञानेश्वर वाघ, इंद्रजित कानु, रूपेश पाटील, निलेश पाटील, दिपक डोंगरे, राहूल पवार, पोना अजिनाथ फुंदे, प्रफुल मोरे, मपोना/गायकवाड, मपोना/ सावंत, पोशि संजय पाटील, विंकात माळी, अजित पाटील यांनी कारवाई केली.






