ज्वेलर्स मालकाची फसवणूक

। पनवेल । वार्ताहर ।
तळोजा परिसरातील एका ज्वेलर्समधून सोने खरेदीच्या नावाने दोन सोन्याच्या अंगठ्या सुमारे तीस हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पियुष सोनी यांच्या मालकीचे आर.सी.गोल्ड हे सोन्याचे दुकान सेक्टर-14 तळोजा फेज 1 येथे आहे. यावेळी सोनी हे या दुकानातून सोन्याची खरेदी व विक्री हा व्यवसाय करीत आहेत. यावेळी पियुष यांना दुकानात आलेल्या एका इसमाने सोन्याची चैन घ्यायाची आहे असे संगितले, त्यानंतर चैन बघून झाल्यानंतर त्या चोरट्याने अंगठी दाखविण्यास सांगितले. यावेळी पियुष हे सोन्याची अंगठी दाखवीत असताना हात चालाखीने त्या चोरट्याने दोन अंगठ्या लंपास केल्या या अंगठ्या किंमत 32000 हजार रुपये इतकी आहे. यावेळी पियुष यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तळोजा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानुसार तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्या चोरट्याच्या शोध तळोजा पोलीस घेत आहेत.

Exit mobile version