। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर सावळा फाटा येथे एका अनोळखी इसमाने आपण पोलीस असून भूलथापा मारून दोघं वाटसरू यांची फसवणूक केली. सोन्याची साखळी आणि अंगठी लंपास केल्याबद्दल कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 27 मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मौजे सावळा फाटा येथील कडाव बौद्धवाडा दोघे थांबले होते. त्यावेळी तेथे दोन अनोळखी इसम यांनी त्या दोन तरुणाजवळ जाऊन आपण पोलीस असून आम्ही चोराकडुन दोन लाख रुपये, अंमली पदार्थ व रिव्हॉल्वर पकडली आहे आणि त्यामुळे हद्दीत गस्ती घालत आहोत. त्याचवेळी आणखी काही संशयित या भागात असल्याने तुम्ही तुमच्याकडील फिर्यादी यांची गळयातील चैन व सोन्याची अंगठी काढून रुमाल मध्ये ठेवायला सांगितले.
त्यानंतर काहीवेळाने ते दोघे रिक्षात बसुन घरी कडाव येथे जात होते, त्यावेळी त्या दोघांनी आपल्या रुमालात असलेल्या आपल्या वस्तू व्यवस्थित आहेत काय याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या रुमालामध्ये कागदपत्रे, आधारकार्ड, मास्क दिसुन आले. तेव्हा फिर्यादी यांची सोन्याची चैन व अंगठी मिळुन आली नाही. त्यामुळे सवाल फाटा येथील त्या दोन पोलीस असलेल्या सांगणाऱ्या तरुणांनी आपली फसवणूक केली असल्याचे लक्षात आले आणि त्यानंतर तात्काळ कर्जत पोलीस ठाणे गाठले आणि आपली फसवणूक झाल्याची तक्रार नोंद केली. सदर गुन्हात एकूण 67,500/-रुपये किमतीची फसवणूक झाले आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कर्जत पोलीस ठाण्यातील हवालदार 1249 लोखंडे हे करीत आहेत.