। चिपळूण । वृत्तसंस्था ।
रस्त्याने जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने दुचाकीस्वाराने चोरल्याची घटना रविवारी तालुक्यातील धामपवणे खोतवाडी ते रावतळे मार्गावर घडली. याप्रकरणी पोलीस स्थानकात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत कल्पना शेंबेकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्या रावतळे येथील बेडेकर यांच्या घरी चपाती-भाजी बनविण्यासाठी जात होत्या. यावेळी धामणवणे रस्त्यावर दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या पाठीमागून येऊन थांबल्या व त्यांना घर कुठे आहे, असे विचारणा केली. त्यावेळी दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या एकाने अचानक शेंबेकर यांच्या गळ्यातील सोन्याची माळ व पेन्डेंट जोरात ओढून जबरदस्तीने खेचून घेतले आणि ते दोघेही निघून गेले.