| पनवेल | प्रतिनिधी |
एसटी प्रवासादरम्यान एका महिलेकडे असलेल्या हॅन्डबॅग मधून सोन्याच्या दागिन्यांची डबी लंपास केल्याची घटना पनवेल एसटी स्टॅन्ड परिसरात घडली आहे. पोयनाड येथील सविता पाटील (66) या पनवेल एसटी स्टॅन्ड येथून शिवशाही बसमध्ये बसल्या असताना त्यांना त्यांच्याकडे असलेल्या हॅन्डबॅगची चैन उघडी दिसली. त्यावेळी त्यांनी अधिक तपासणी केली असता त्यांच्याकडे असलेल्या सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याच्या 4 बांगड्या व सोन्याचा हार असा मिळून 11 लाख 20 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्याने चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबातची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.







