। पुणे । प्रतिनिधी ।
अहिल्यानगर शहरातील माळीवाडा बसस्थानकात बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत महिलेकडील दागिन्यांची चोरी झाली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहिल्यानगर येथील रूपाली दत्तात्रय चाकणे (34) या बुधवारी श्रीगोंदे येथे जाण्यासाठी माळीवाडा बसस्थानकावर आल्या होत्या. दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान अहिल्यानगर-श्रीगोंदे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रुपाली यांच्याकडील ऐवज असलेली बॅग चोरली. यात बॅगेत असलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम व कागदपत्रे असा 62 हजार 158 रुपयांचा ऐवज चोरण्यात आला. याबाबत रूपाली चाकणे यांच्या तक्रारीनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.