लाखो रुपयाचे नुकसान
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील तळोजा एमआयडीसी नावडे फाटा जय मातादी हॉटेल जवळ असलेल्या बेकायदेशीर लाकडी गोदामाला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास या गोदामाला अचानकपणे आग लागली. आगीने रौद्ररुप धारण करताच परिसरातील नागरिकांनी तळोजा पोलीस ठाणे व अग्नीशमन दलाला या आगीबाबत कळविण्यात आले. तातडीने पनवेल, तळोजा, कळंबोली परिसरातील अग्नीशमन बंब घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. या आगीत लाखो रुपये किंमतीचे लाकडी सामान व इतर वस्तू भस्मसात झाल्या असून जिवीतहानी झाली नाही आहे. परंतु या परिसरातील अशा प्रकारे बेकायदेशीर गोदाम उभारण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीयुक्त वातावरण असून पनवेल महापालिकेने अशा गोदामांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी येथील रहिवाशी करीत आहेत.