। पनवेल । वार्ताहर ।
उसर्ली येथील एक 62 वर्षीय वृद्ध महिला राहत्या घरातून पहाटेच्या सुमारास कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अनुसयाबाई शिर्के (62) असे या महिलेचे नाव असून, बांधा सडपातळ, उंची 4 फुट 5 इंच, रंग गोरा, डोक्याचे केस काळे-पांढरे, डोळे काळे असून, अंगात निळ्या रंगाची साडी, लाल रंगाचा ब्लाऊज, पायात काळ्या रंगाची चप्पल घातलेली आहे. तिला मराठी भाषा अवगत आहे. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दुरध्वनी 022-27452333 किंवा सहा.पो.उपनि. हनुमंत आहिरे यांच्याशी संपर्क साधावा.