। पनवेल । वार्ताहर ।
ओवे रोड येथे चार जणांनी एका घरात प्रवेश करून चार मोबाईल आणि रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी चार अनोळखी ईसमाविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अफफान मोहम्मद अयुब खान बुबेरे हे तळोजा पाचनंद, ओवे रोड येथे राहत असून ते घरात झोपले होते. त्याचवेळी त्यांना जाग आली असता त्यांना एक मुलगा बाहेर जाताना दिसला. त्यांनी पाठलाग केला असता यावेळी त्याने घराच्या गॅलरीतून खाली उडी मारली. त्या अनोळखी मुलाबरोबर इतर तीन इसम पळताना दिसले. त्यांनी घरात पाहिले असता त्यांच्या आणि काकांच्या घरातून चार मोबाईल, पंचवीस हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचे समझले. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात चार अनोळखी ईसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.