। नवीन पनवेल । वार्ताहर ।
चिंचपाडा गावाजवळ जेएनपीटी महामार्गावर एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवी कुमार पुजारा (30) हा आपल्या दुचाकीवरून जे डब्ल्यू आर कंपनी पाडेघर या ठिकाणी कामानिमित्त गेला होता. काम संपवून तो ऑफिसला जेएनपीटी हायवेने परत येत होता. दरम्यान, चिंचपाडा गावाजवळ जेएनपीटी हायवेवर आला असता अज्ञात वाहनचालकाने दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेत तो खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघाताप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.