| पनवेल | वार्ताहर |
एसटी प्रवासादरम्यान लाखो रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शुभांगी पाटील (43) या डोंबिवली ते पेण असा बसने प्रवास करीत असताना, प्रवासा दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेमधून जवळपास 2 लाख 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.