महिलेच्या बॅगेतून दागिने लंपास

। अलिबाग । प्रतिनिधी ।

माणगावहून महाजने प्रवास करीत असताना एका महिलेच्या बॅगेतील दागिने लंपास करण्यात आले. ही घटना शुक्रवारी (दि.29) सायंकाळच्या सुमारास घडली असून रेवदंडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञाताविरोधात गून्हा दाखल करण्यात आला आहे.

महाजने येथील महिला सकाळी माणगावमध्ये कामानिमित्त गेली होती. काम आटोपून झाल्यावर परतीच्या मार्गावर निघाली. सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घरी आल्यावर बॅगेची चेन उघडून पाहिली असता, बॅगेतील सोन्याचे दागिने, मनगटी घड्याळ दिसून आले नाही. अखेर त्यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात जाऊन दागिन्यांसह एकूण एक लाख 82 हजार 526 रुपये किंमतीचा ऐवज चोरण्यात आल्याची तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पडवळ अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version