। पनवेल । वार्ताहर ।
श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट, आम्ही रक्तदाते पनवेलचे, पूज्य सिंधी पंचायत ट्रस्ट आणि एमजीएम हॉस्पिटल कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने 16 जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन पनवेल येथील पूज्य श्री सिंधी पंचायत हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी 75 जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पनवेलमधील डॉक्टर ययाती गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजू सचदेव, दौलत सचदेव, अॅड. मनोहर सचदेव, देवानी, अॅड. अमोल साखरे, मुलरीधर डाके, भूषण चोणकर इत्यादी उपस्थित होते.
झुलेलाल ट्रस्ट रक्तदान शिबीर
