| खरोशी | प्रतिनिधी |
वडाळा मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुहित जीवन ट्रस्ट, पेण संस्थेतील विद्यार्थी जितेश साजेकर याने 53 किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक तसेच यश पांगत याने 74 किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक मिळवून आपल्या पालक, शिक्षक व संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक दिव्यांग प्रतिस्पर्धी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सुहितमधील विद्यार्थ्यांनी अथक मेहनत व सरावाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत या स्पर्धेत आपल्या क्रीडा कर्तृत्वाने सुवर्णपदक मिळवून संस्थेचे व त्यांचे प्रशिक्षक राजेश अनगत व अमोल काईनकर यांचे नाव उंचावले आहे.
जितेश आणि यशला सुवर्णपदक
