माणगाव । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील सी.के.टी ज्युनिअर कॉलेज खारघर येथे जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धा संपन्न झाल्या. सदर स्पर्धेत एस.एस.निकम इंग्लिश स्कुल, माणगाव शाळेच्या पाच विद्यार्थ्यांनी यश संपादन करून शाळेच्या यशामध्ये मानाचा तुरा रोवण्याचा काम केले. या स्पर्धेमध्ये रुद्र चव्हाण, तनश्री सावंत, आयुष मोरे, प्रसाद मालोरे यांनी सुवर्णपदक पटकाविले तर अभिषेक पडळकर याने रौप्यपदक मिळवून यश संपादन केले. सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक मंदार चवरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. वरील सर्व खेळाडूंचे व क्रीडा शिक्षकांचे माणगाव एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, शाळेच्या संगीता कोकाटे, विजय पाईकराव, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन करून कौतुक केले.