अलिबागमध्ये नोकरीविषयी मार्गदर्शन शिबीर

। अलिबाग । प्रतिनिधी ।

सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगाराचे दालन खुले व्हावे यासाठी अलिबागमध्ये नोकरीविषयी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. अलिबागमधील कुरुळ येथील क्षात्रैक्य समाज सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, स्टेट बँक ऑफ इंडिया, आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी, ब्रहन्मुंबई महानगरपालिका, नाबार्ड अशा विविध बारा आस्थापनांमधील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, डिग्री पात्रतेच्या उमेदवारांसाठी उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधीबाबत सखोल माहिती देण्यात आली. पदांचे नाव, रिक्त पदांची संख्या, पात्रता, वयोमर्यादा, वेतन, अर्जाचे शुल्क, ऑनलाइन अ‍ॅड्रेस, अर्ज करण्याची अंतिम तारीख यासह परीक्षा पद्धती, अभ्यासक्रमाचे स्वरूप, अभ्यासाचे वेळापत्रक आदी मार्गदर्शन सहायक आयुक्त सुहास पाटील यांनी व्याख्यानातून केले.

यावेळी क्षात्रैक्य समाज अलिबागचे अध्यक्ष द्वारकानाथ नाईक, सचिव प्रदीप नाईक, सहसचिव महेश कवळे, खजिनदार मनोज राऊळ, सहखजिनदार रवींद्र वर्तक, श्रीनाथ कवळे,अविनाश राऊळ, के.डी. पाटील, रमेश पाटील, माजी एअरफोर्स ऑफिसर ठाकूर यांच्यासह रोजगार आणि नोकरीच्या प्रतीक्षेत राहून प्रयत्न करणारे 80हून अधिक विद्यार्थी उमेदवार आणि त्यांचे पालक उपस्थित होते.

Exit mobile version