दरेकरांच्या पुतळ्याला जोडो मारो आंदोलन

। नेरळ । वार्ताहर ।
लावणी कलावंत सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशानंतर भाजपचे नेते आणि राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपहासात्मक टीका केली होती. दरम्यान, त्यामुळे संतापलेल्या कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी प्रवीण दरेकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडो मारो आंदोलन केले.
प्रवीण दरेकर यांनी केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे वतीने कर्जत टिळक चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष रंजना धुळे, रायगड जिल्हा सरचिटणीस पूजा सुर्वे, नगरसेविका मधुरा चंदन, नगरसेविका पुष्पा दगडे, नगरसेविका सुवर्णा नीलधे, सरपंच वंदना थोरवे, नयना आखाडे, मनीषा पाटील यांसह राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Exit mobile version