रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी जोशी, तर सेक्रेटरीपदी बोधनकर

| खोपोली | प्रतिनिधी |
सामाजिक बांधिलकी जपणारी रोटरी क्लब ऑफ खोपोली ही संघटना शहरापासून ते ग्रामीण भागत विविध सामाजिक उपक्रम राबवित गोरगरीबांना मदत करणारी संघटना आहे. मागील वर्षाचे अध्यक्ष सुरेश खेडकर यांचा कार्यकाल संपप्त होताच नवनिर्वाचित अध्यक्षपदी सुरेंद्र जोशी, तर सेक्रेटरी मिलिंद बोधनकर यांच्यासह सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. कोरोना काळात अनेक उपक्रम राबिणारे सुरेश खेडकर यांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करीत नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रोटरी क्लबच्या घटनेनुसार दर वर्षाला अध्यक्षपद बदलून नवीन होतकरूंना काम करण्याची संधी दिली जाते. या नवनिर्वाचित कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम आणि पदभार सोहळा रोटरी क्लबच्या सभागृहात पुणे जिल्ह्याचे मा. अध्यक्ष रो. मोहन पलेसीया यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी व्यासपीठावर नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेंद्र जोशी, सेक्रेटरी मिलिंद बोधनकर, मा. अध्यक्ष सुरेश खेडकर सपत्नीक उपस्थित होते.

Exit mobile version