पत्रकार प्रकाश सद्रे यांचे निधन

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुका पत्रकार संघाचे सल्लागार व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश सद्रे यांचे राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवारी (दि. 4) निधन झाले.निधनसमयी ते 64 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्रकाश सद्रे यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात दैनिक सागर वर्तमानपत्रातून केली. कृषीवल, सागर, पुढारी आदी वृत्तपत्रातून गेली 30 वर्षांच्या पत्रकारितेतून त्यांनी मुरुड तालुक्याच्या अनेक समस्या मांडल्या. त्यात विशेष म्हणजे रोहा येथून केळघरमार्गे मुरुड हा रस्ता लवकरात लवकर होण्यासाठी त्यांनी पाठपुरावा करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मच्छिमारांच्या समस्या मांडून अनेकवेळा वाचा फोडली. 30 वर्षांच्या कारकीर्दीत सतत काम कारणारा पत्रकार गमावल्याचे दुःख कोकणातील पत्रकात आहे. त्यांनी बँक ऑफ इंडियामध्ये सेवा बजावून कॅशिअरपदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, नातवंडे व एक भाऊ असा परिवार आहे.

Exit mobile version