पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान

सुधागड पोलीस प्रशासनाचा उपक्रम
। राबगाव/पाली । वार्ताहर ।
पत्रकार दिनानिमित्त गुरुवारी (दि.6) सायंकाळी पाली तहसील कार्यालयात सुधागड तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तहसिलदार दिलीप रायण्णावार, गटविकास अधिकारी विजय यादव, पोलीस निरीक्षक विश्‍वजित काइंगडे व नायब तहसीलदार दिलीप कोष्टी यांनी सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या व त्यांना सन्मानित केले. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तिसरा डोळा आहे, असे तहसिलदार दिलीप रायण्णावार यावेळी म्हणाले. तर पोलीस निरीक्षक विश्‍वजित काइंगडे म्हणाले की, डिजिटल माध्यमाच्या युगात आजही पत्रकारिता प्रभावी ठरत आहेत. पत्रकार आपल्या लेखणीतून अनेक परिवर्तन घडवून आणतात. यावेळी जेष्ठ पत्रकार रवींद्रनाथ ओव्हाळ, सुधागड प्रेस क्लबचे अध्यक्ष विनोद भोईर, जेष्ठ पत्रकार दत्तात्रेय दळवी, मंगेश यादव, गौसखान पठाण, अमित गायकवाड, संदेश उतेकर, प्रशांत हिंगणे व चेतन वाळंज आदी पत्रकार उपस्थित होते.

Exit mobile version