। माणगाव । वार्ताहर ।
माणगावात शिवसैनिकांनी नगरपंचायत कार्यालय याठिकाणी बुधवार (दि.12 ) रोजी शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना नाव तसेच ढाल – तलवार निशाणी मिळाल्याने फटाक्यांची आतषबाजी करीत आपला आनंद साजरा करून जल्लोष केला. यावेळी प्रमोद घोसाळकर, अँड.महेंद्र मानकर यानी मनोगत व्यक्त केले. यावेळी अरुण चाळके, अँड.राजीव साबळे, विपुल उभारे,अँड.महेंद्र मानकर, नितीन पवार,सुजित शिंदे, सुधीर पवार,नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार,सचिन बोंबले, दिनेश रातवडकर,कपिल गायकवाड, नितीन बामगुडे, वैभव मोरे, सुनील पवार,जगदीश दोशी,प्रताप घोसाळकर,मधुकर नाडकर,योगेश बक्कम,जितेंद्र तेटगुरे,प्रसाद धारिया,मेहुल उभारे,महिला पदाधिकारी अरुणा वाघमारे,करुणा देसाई,नीलम बामुगडे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.