| उरण । वार्ताहर ।
राष्ट्रीय सेवा योजना व लायन्स क्लब उरण यांच्या संयुक्त विद्माने वीर वाजेकर महाविद्यालयात कर्करोगाविषयी माहितीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. श्वेता बन्सल यांनी कर्करोग कसा होतो,त्याची जेनेटिक कारणे उपाय,काळजी कशी घ्यावी तसेच मोठी माणसे आणि लहान मुले यांच्यातील कर्करोगाविषयी शास्त्रीय माहिती सांगितली. डॉ.साहेबराव ओहोळ यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी सुधीर सक्सेना, विवेक शर्मा,अमरचंद शर्मा, सदानंद गायकवाड डॉ.पी.जी.पवार, डॉ.विलास महाले, प्रा.राम गोसावी, प्रा.संतोष देसाई, प्रा.देशमुख, प्रा.राजकुमार कांबळे, प्रा.योगेश कुलकर्णी, प्रा.चारुशीला घरत, प्रा.देवेंद्र कांबळे, डॉ.रत्नमाला जावळे, प्रा.इनामदार,प्रा.बळीराम पवार उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रा.श्रीकांत गोतपगार यांनी मानले, प्रा.सी.डी.धिंदळे यांनी सूत्रसंचालन केले.