अलिबाग नगरपरिषदेचा लौकिक महाराष्ट्रात न्या; धैर्यशिल पाटील यांचे आवाहन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या सेवा आणि संघर्षाचा वसा प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखालील टिमने चांगल्या प्रकारे जोपासल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतानाच जिल्ह्यातील सर्वात उत्कृष्ट आणि चांगल्या असलेल्या अलिबाग नगरपरिषदेचा लौकिक असाच महाराष्ट्रात न्या या शब्दात शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार धैर्यशिल पाटील यांनी प्रशंसोद्गार काढीत गौरव केला.
कोरोनाच्या कठीण काळात बापाला मुलगा विचारत नव्हता की मुलाला बाप शिवत नव्हता, लोकं नातीगोती विसरली होती अशा भयावह परिस्थीतीत सेवेचा वसा शेतकरी कामगार पक्षाने जपला. अलिबाग तालुका आणि अलिबाग शहरतील शेकापक्षाने सर्वाधिक चांगल्या पद्धतीने जोपासल्याबद्दल कार्यकर्त्यांना त्यांनी आवर्जून धन्यवाद दिले.
या परिस्थितीमध्ये प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करत होते. पण सगळ्यात उत्कृष्ट काम अलिबाग नगरपालिकेने केले आहे. शेकापच्या या नगरपालिकेत प्रशांत नाईक यांच्या सारख्या ताकदीच्या नेतृत्वाला जयंत पाटील, मीनाक्षी पाटील, पंडित पाटील यांच्या ताकदीची साथ लाभल्याने हे शक्य होऊ शकले. पैशाचा ओघ अनेक नगरपालिकेत आणला जातो. पण त्या पैशाचा विनीयोग तुम्ही करुन दाखवलात. 17 समोर शुन्य असा निकाल देणार्‍यांना मार्गदर्शन काय करणार तुम्ही जपलेला सेवाभाव माणुसकी सदैव जपलीत चांगले काम करुन दाखवलेत सुस्कृंतपणा आणि सुशिक्षीत लोकांचे गाव ही ओळख असणार्‍या अलिबागचा जिल्ह्यातील सर्वात उत्कृष्ट नगरपालिकेकचा लौकिक महाराष्ट्रभर न्या असे आवाहन त्यांनी केले.

Exit mobile version