कालभैरव कोयनानगर प्रथम क्रमांकाचा मानकरी
| चिपळूण | प्रतिनिधी |
तालुक्यातील वेहेळे भोजनेवाडी येथील राधाकृष्ण मंदिराच्या भव्य महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. मॅटवरील कबड्डी स्पर्धेचा प्रथम क्रमांक क्रमांकाचा कालभैरव कोयनानगर मानकरी ठरला आहे. तर, द्वितीय महाकाली कुंभार्ली संघ, तृतीय सिद्धिविनायक कळकवणे तर चतुर्थ क्रमांक सिद्धार्थ धामणे संघाने मिळवला. या यशस्वी संघांना आमदार शेखर निकम व सातारा नगरपरिषदेचे सुहास राजेशिर्के यांच्यासह वेहेळे भोजनेवाडी येथील ग्रामस्थांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी माजी उपसभापती सुर्यकांत खेतले, माजी पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर, वेहेळे ग्रामपंचायत माजी उपसरपंच प्रकाश भोजने, सदस्य दिलीप भोजने, माजी सरपंच दिलीप राजेशिर्के, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष उदय भोजने, गोविंद मिरगल, महेश वाजे, राम राजेशिर्के, बंड्या राजेशिर्के तसेच राधाकृष्ण युवक मंडळातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. येथील अखंड हरिनाम सप्ताह सोहळा व मॅटवरील कबड्डी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.