वेश्वीत कबड्डीचा थरार सुरु

चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन
अंतिम विजेत्याचा पूर्वा भगत चषकाने होणार सन्मान

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

वेश्वी येथील ओंकार क्रीडा मंडळ आयोजित कबड्डी स्पर्धेला सुरुवात राजिप शाळेच्या मैदानात शनिवारी (दि.11) रोजी झाली. शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन जल्लोषात करण्यात आले. उद्घाटनीय सामन्यात शहिद निलेश तुणतुणे संघाने 21 तर गावदेवी मुशेत संघाने 13 गुण मिळविले. त्यामुळे सहाणगोठी येथील संघ आठ गुणांनी विजयी झाला.

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने तसेच वेश्वीचे माजी सरपंच प्रफुल्ल पाटील यांच्या संकल्पनेतून अलिबाग तालुक्यातील वेश्वीमधील ओंकार क्रीडा मंडळाच्या पुरुष गटाच्या खुल्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत 32 संघाने सहभाग घेतला आहे.


या स्पर्धेसाठी भव्य दिव्य अशी तीन मैदाने उभारण्यात आली आहेत. अंतिम लढतीनंतर विजेत्या संघाला 21 हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला 15 हजार रुपये व चषक, तृतीय व तृतीय क्रमांकाला रोख प्रत्येकी 10 हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्वात्कृष्ठ खेळाडूला वॉशिंग मशीन, पब्लिक हिरो या खेळाडूला इलेक्ट्रीकल ओव्हन, उत्कृष्ठ पकड आणि उत्कृष्ठ चढाई करणाऱ्या खेळाडूला प्रत्येकी सायकल देऊन सन्मानित केले जाणार आहे. तसेच आदर्श खेळाडूला चषक दिले जाणार आहे. ही स्पर्धा प्रेक्षकांना घर बसल्या बघण्याचा आनंद मिळावा यासाठी युट्यूब या सोशल मिडियाचा वापर करण्यात आला आहे.

उद्घाटनप्रसंगी अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती अनिल पाटील, ओंकार क्रीडा मंडळाचे अध्यक्ष वेश्वीचे माजी सरपंच प्रफुल्ल पाटील, ज्येष्ठ नागरिक विष्णू मगर, उपसरपंच आरती पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनंत मुळूसकर, मंडळाचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके, सचिव गिरीश शेळके, सुरेश शेळके, निलेश मगर, कबड्डी निरीक्षक जनार्दन पाटील, रविंद्र पाटील, संदीप शेळके सदानंद शेळके, राजेंद्र राऊळ, राघव गुरव, रूपाली गुरव, जुई शेळके, अरुण पाटील, राघव म्हात्रे, गजानन नाईक, सुभाष पाटील, सुरेश शेळके, संदीप घटत, कृष्णा धनवी, प्रशांत राऊळ, गिरीश शेळके, जितेंद्र शेळके, पंकज गुरव, अमोल नलावडे, नंदकुमार मिसाळ, निलेश नलावडे, प्रसाद मगर, सुशांत नलावडे, राकेश राऊळ, जितेंद्र गुरव, रुपेश गुरव, गजानन मगर, संदीप म्हात्रे, अमित मुळुस्कर, हेमंत नाईक, सुरेंद्र शेळके, विनोद ठाकूर, दिलीप पाटील आदी मान्यवर मंडळाचे पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.

ओंकार क्रीडा मंडळाचे कार्य कौतुकास्पद - चित्रलेखा पाटील
ओंकार क्रीडा मंडळाने कबड्डीची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून जपली आहे. या स्पर्धा दर्जेदार आणि नामंकित होत आहे. स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम मंडळाच्यामार्फत करण्यात आले आहे. शेतकरी कामगार पक्ष कायमच स्थानिकांच्या पाठीशी राहिला आहे. शिक्षण, सांस्कृतिक असे कोणतेही क्षेत्र असो या माध्यमातून सहकार्य करण्याचे काम शेकापने केले आहे. शेकाप नेते जयंत पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. ओंकार क्रीडा मंडळाचे कार्य खऱ्या अर्थाने कौतुकास्पद असून शेकाप पाठीशी असल्याचे सांगून मंडळाला पुढील वाटचालीच्या शुभेच्छा शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिल्या.
असा रंगला सामना
उद्घाटनीय सामना सहाणगोठी येथील शाहिद निलेश तुणतुणे संघ आणि मुशेत येथील गावदेवी संघ या दोन संघामध्ये झाला. सुरुवातीला मुशेतमधील संघ आघाडीवर होता. मात्र, सहाणगोठी संघाने आपले कौशल्य दाखवत गुण अधिक वाढविण्यावर भर दिला. शेवटच्या तीन मिनीटात सहाणगोठी संघाने 17 आणि मुशेत संघाने 11 गुण मिळविले हेोते. शेवटपर्यंत दोन्ही संघातील खेळाडू चढाई व पकडेच्या माध्यमातून गुण मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. अखेर सहाण गोठी संघाने 21 व मुशेत संघाला 13 गुण मिळाल्याने सहाणगोठी संघ विजेता ठरला.
Exit mobile version