काजल भामरे देसाई ठरली सन 2022 ची मिसेस इंडिया

। रसायनी । वार्ताहर ।
एएसव्ही प्रोडक्शन आयोजित मिस्टर अँड मिसेस रॉयल स्टार इंडिया या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत काजल भामरे-देसाई ही मिसेस रॉयल इंडिया 2022ची महाविजेती ठरली. या स्पर्धेत विविध राज्यांतील एकूण 42 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये महाराष्ट्रातून काजलने या टॅलेंट राऊंड/प्रश्‍नोत्तर राऊंड यात परीक्षकांची मने जिंकून मिसेस इंडियाचा मुकूट पटकावला आहे.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बिग बॉस जी फिम डोनल बिस्ट आल्या होत्या. त्यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावर महाविजेती असा सार उमटवला आहे. काजलचा पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याचा मानस आहे. ही स्पर्धा जयपूर येथे पार पडली.

Exit mobile version