। मुंबई । प्रतिनिधी ।
क्रिकेट जगतात प्रत्येक क्रिकेटरलला त्याच्या खेळाच्या शैलीनुसार ओळखले जाते. इतर खेळाडूंप्रमाणे भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवदेखील त्याच्या सुपला शॉटमुळे ओळखला जातो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कान्हेवाडी बुद्रुक राजगुरूनगर येथील हा व्हिडीयो असून एक महिला साडीमध्ये क्रिकेट खेळताना दिसत आहे. कदाचित हा व्हिडीओ क्रिकेट स्पर्धेतील असल्याचे समजत आहे. कारण, या व्हिडीओमध्ये कॉमेंट्री ऐकायला मिळत आहे. या दरम्यान सुपला शॉट असे वाक्य या व्हिडीओवर लिहण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये महिला चेंडू येताच बॅट खाली टेकवत शानदार चौकार मारते. या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. महिलेची स्टाईल पाहून सर्वांना सूर्यकुमार यादवच्या सुपला शॉटची आठवण झाली.
काकूंचा सुपला शॉट
