कलगीतुरा सांस्कृतिक समन्वय समितीची कार्यकारीणी जाहीर


| माणगाव | वार्ताहर |

कलगीतुरा सांस्कृतिक समन्वय समिती रायगड-रत्नागिरी यांची कार्यकारीणी सभा(दि.21) कुणबी भवन माणगाव याठिकाणी उत्साहात संपन्न झाली. सभा विषयाच्या अनुषंगाने प्रथम उपस्थित पदाधिकारी, शाहीर, कलाकार मंडळी यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर समन्वय समितीची ध्येय, धोरणे निश्चित करण्याचा दृष्टीने विचार मांडण्यात आले. त्यावर सखोल आणि कला, शाहीर हितकारक वैचारिक चर्चा करून त्यावर धोरण निश्चिती करण्यात आली. त्या अनुषंगाने रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील लोककला मंडळे यांच्याशी समन्वय समितीची भूमिका, विचार ठेवण्याचा निर्णय करण्यात आला.

या सभेला रामभाऊ टेंबे, सुरेश महाबळे, श्री. बक्कम, कृष्णा शिंदे, सचिन माळी, सहदेव उत्तेकर, शंकर तुर्डे, हरिदास शिंदे, बाळा महाबळे, शिवाजी वालंज, मालु पाटेकर, अर्जुन कळमकर, महादेव तेलेंगे, रामचंद्र म्हात्रे, नथुराम पाष्टे, दीपक भोस्तेकर, हरी वेजरीम, रमेश शिर्के, राजाराम जाधव, नारायण पडवळ, एकनाथ मांढरे, केशव बटावले, गोविंद शिंदे, सुनील शिगवण, श्रीराम भोईर, संतोष भात्रे, बाळा पाष्टे व शाहीर, कलावंत उपस्थित होते. या सभेत कलगीतुरा सांस्कृतिक समन्वय समिती रायगड रत्नागिरी कार्यकारीणी रामभाऊ टेंबे, सुरेशदादा महाबळे, कृष्णा शिंदे, रामचंद्र म्हात्रे, सचिन माळी, सहदेव उत्तेकर, श्रीधर वालंज, शंकर फणसे, रामदास वारीक, किसन बाटे, शंकर तुर्डे, वसंत भोईर, विद्यानंद अधिकारी, अजित लाड, परशुराम खानविलकर, वामन बैकर, अरुण नाकती, पवन महाडिक, रमेश शिर्के, नथुराम पाष्टे अशी विस्तारित कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली.

Exit mobile version